ST bus
sakal
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र सरकारने भाविकांना भेट दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० विशेष बस चालवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे पंढरपूरला वारीसाठी जाणारे भक्त तसेच इतर प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरळीत होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे.