
रोहा : रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे कोकणवासीय जिल्ह्यात दाखल झाले होते. सात दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करून कोकणवासीय मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. पहिल्याच दिवशी रोहा आगारातून ४५ गाड्या ग्रुप बुकिंगसाठी, तर २७ गाड्या या आरक्षित तिकिटे सुविधा असलेल्यांना, तर पनवेलपर्यंत जाण्यासाठी २० गाड्या राखीव ठेवल्या आहेत. राखीव गाड्या दर अर्धा तासाने विनावाहक पद्धतीने सोडण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून रोह्यात येण्यासाठी पुरेशा गाड्यांचे नियोजनही केले असल्याची माहिती रोहा आगारप्रमुख प्रकाश शेलार यांनी दिली.