
पुणे : महाराष्ट्रात सध्या सत्तानाट्याचा खेळ सुरुच असून मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जनतेला कळू शकलेलं नाही. त्यामुळं सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होत आहे. यामुळं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्यानं खुद्द मोहोळ यांनीच या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.