
मुंबई : "मुंबई 24 तास' धोरणाची नियमावली राज्य सरकारने आज जाहीर केली. त्यानुसार रात्री दीड वाजल्यानंतर मद्याची विक्री केल्यास विक्रेत्याचा मद्य परवाना दोन वर्षांसाठी रद्द होणार आहे तर, मॉल्सना त्यांची दालने 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी गमवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच बरोबर मॉलमधील मल्टिप्लेक्स रात्री एकनंतर सुरु ठेवण्याबाबत कामगार विभागाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अबकारी विभागाच्या नियमानुसार बार रात्री 1.30 पर्यंत बंद होणे आवश्यक आहे. त्यानुसार 1.30 वाजल्यानंतर केवळ मद्य विक्री करता येणार नाही. त्यासाठी ग्राहकांकडून शेवटची ऑर्डर रात्री एक वाजेपर्यंत घेता येणार आहे. तशी नोटीस दर्शनी ठिकाणी लावणेही बंधनकारक आहे.
केजरीवाल अमित शहांना म्हणतात,' सर, मोफत चार्जिंगची सोयही केली आहे!
मॉल्स आणि मिलवरील जमिनीवर असलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 24 तास व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भविष्यात या योजनेचा विस्तार रेल्वे स्थानके, विमानतळ, बिझनेस हबच्या परिसरातील उपहागृह सुरु ठेवण्याचा विचार करण्यात येईल. क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळी पोलिस सुरक्षा पुरवल्याच्या मोबदल्यात संबंधितांकडून शुल्क वसुल केले जाते. त्याच धर्तीवर एखाद्या ठिकाणी मोठी गर्दी होणार असेल तर त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरवल्यास संबंधितांना शुल्क भरावे लागणार आहे. त्याच बरोबर गरजेनुसार बेस्ट बसेसही सुरु ठेवण्यात येतील.