Mumbai Agra Accident
Mumbai Agra AccidentSakal

मालेगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक; तीन जागीच ठार, ९ जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. मालेगावकडून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने आपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात क्रूझर आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगाववरून कांदा घेऊन मध्य प्रदेशकडे एक ट्रक भरधाव वेगात चालला होता. या ट्रकने मुंबई-आग्रा महामार्गावर एका आपे रिक्षाला धडक दिली. या धडकेत एक क्रूझर आणि या रिक्षाचा चुराडा झाला आहे.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमी झालेल्या व्यक्ती पारोळा तालुक्यातल्या तरडी गावचे रहिवासी असल्याची माहिती हाती येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com