

Ajit Pawar Clears Air on Parth Pawar Land Row
Sakal
मुंबई : पुणे येथील वादग्रस्त जमीन गैरव्यवहाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन आपण माध्यमांपुढे येणार असल्याचे अजित पवार यांनी काल जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर याबाबत खुलासा केला. प्रथमदर्शनी माहितीनुसार या व्यवहारात कोणत्याही प्रकारे पैशाची देवाणघेवाण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.