CEAT Tyre : सीएट टायर कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या टायरची तपासणी mumbai ceat tyre company samruddhi expressway vehicles tyre cheaking | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CEAT Tyre Company

CEAT Tyre : सीएट टायर कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या टायरची तपासणी

मुंबई - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर टायर फुटून वाहनांच्या अपघातांची आकडेवारी वाढत आहे. त्यामूळे रस्ता सुरक्षा कक्ष आणि सीएट टायर कंपनीच्या माध्यमातून समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहनांचे टायर तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे. या टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन परिवहन आयुक्तांच्या हस्ते ९ जून रोजी शिर्डी येथे करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने परिवहन विभाग, महामार्ग पोलीस विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेमार्फत विविध उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने सुरु आहे. समृद्धी महामार्गावर होत असलेले काही अपघात टायर फुटल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील अपघातात घट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सीएट कंपनी टायर उत्पादकांमार्फत त्यांच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचे उपक्रम हाती घेतले आहे.

महामार्गावर प्रवास करतांना प्रवासादरम्यान वाहनांचे टायर, योग्य गुणवत्तेचे, वेग मर्यादेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गावर प्रवास करतांना प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सदर महामार्गाच्या सुरुवातीला सुरु करण्यात येणाऱ्या टायर तपासणी केंद्रावर वाहनांचे टायर तपासणी करुन ते पुढील प्रवासासाठी सुस्थितीत आहेत याची खात्री करणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या टोल नाक्यांवर मोफत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

या असतील सुविधा

- नायट्रोजन भरणे.

- बेसिक एअर फिलिंग.

- टायर वेअर तपासणी.

- वॉल्व तपासणी.

- वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट,

- बेसिक पंक्चर दुरुरती.

- टायर चेअर चेक यंत्राचे वितरण.

राज्यात आतापर्यंत १३६५१ वाहतुकदारांची जनजागृती केली असून, त्यापैकी ६४२ वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारला आहे. ३४८ वाहन विना रिफलेक्टर, इंटरसेप्टर व्हेईकलच्या माध्यमातून ५१ ओव्हरस्पीड, १३३ लेन कटींग, नो पार्किंग ९९, रिफलेक्टर ३२ तर आॅन रोड चेकिंग करतांना १३६ ओव्हरस्पीड वाहने, लेन कटिंग १२१९ वाहने,नो पार्किंग १५२४ वाहने, रिफलेक्टर नसलेले ५८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.