esakal | Mumbai: मुंबईच्या धर्तीवर राज्यातही इलेक्ट्रीक बस
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रीक बस

मुंबईच्या धर्तीवर राज्यातही इलेक्ट्रीक बस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट पर्यावरण पुरक इलेक्टीक बसचा ताफा वाढवत आहे. मुंबईच्या धर्तीवर इतरही शहरात इलेक्ट्रीक बस आणू असे सुतोवाच आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.

बेस्टच्या वरळी डेपोत आज 60 इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या. य़ा बसेसचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हि घोषणा केली. पर्यावरण वाहतूक सुविधा वाढवण्यासाठी बेस्ट प्रयत्न करत आहे. टप्प्या टप्पाने सर्व बसेस इलेक्ट्रीकच्या करण्यात येतील असेही त्यांनी नमुद केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासह संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख एरिक सोल्हेम उपस्थीत होते

हेही वाचा: पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार : आदित्य ठाकरेंचा टोला

विमतळावरुन विशेष सेवा

बेस्टने विमानतळा पासून वांद्रे कुर्ला संकुल, तसेच फोर्ट पर्यत विशेष सेवा सुरु केली आहे.दर 45 मिनीटांंनी या बसेस सुटणार आहेत.

loading image
go to top