Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर अपूर्ण कामे, खड्डे आणि धुळीमुळे प्रवासी हैराण

Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highway
Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highwayesakal

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे आणि धुळीमुळे प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. वाकण नाक्यावर सुरू असलेल्‍या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट व सिमेंटचा बारीक भुकटी उडते. यावर उपाय म्हणून टँकरद्वारे पाणी फवारले जात आहे. मात्र अवघ्‍या काही मिनिटांत पाणी सुकत असल्‍याने पुन्हा जैसे थे स्‍थिती होत असल्‍याचे वाहनचालकांचे म्‍हणणे आहे.

Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highway
Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

महामार्गावर सतत अवजड व प्रवासी वाहतूक सुरू असून धुळीचे साम्राज्‍य पसरले आहे. त्‍यामुळे मार्गक्रमण होताना चालकांसह प्रवाशांना श्‍वसनाचा त्रास जाणवतो, तर डोळे चुरचुरणे, लाल होण्याचे प्रकारही वाढले आहेत. महामार्गालगतचे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, रहिवासीही त्रस्त झाले आहेत. पाणी मारल्यावर तात्पुरत्या स्वरूपात धुळीपासून दिलासा मिळतो मात्र पाणी सुकल्यावर पुन्हा धुळीचा लोट उडत असल्‍याने साफसफाई तरी किती करावी, असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. यात पाण्याचाही अपव्यय होत असून चिखल झाल्यावर दुचाकी घसरून अपघाताची शक्‍यताही वाढली आहे.


पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १० ते १२ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्‍याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्‍यातील माती, रेती, काँक्रिट उखडली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडते. महामार्गावरून नियमित प्रवास करणारे चालक, दुचाकीस्‍वारांसह प्रवाशांच्या नाकातोंडात धूळ जात असल्‍याने श्‍वसनाचे आजार बळावले आहेत. महामार्गालगत राहणारी लहान मुले व वृद्धांच्याही आरोग्‍यावर विपरीत परिणाम होत आहे. सततच्या वर्दळीमुळे इतक्‍या मोठ्या प्रमाणात धूळ उडते की समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्‍यामुळे अपघाताचाही धोका असल्‍याचे चालक सांगतात.

Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highway
Mumbai Goa Highway: "मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार"; गडकरींनी कबुली देताना सांगितल्या अडचणी

दुचाकीस्वार बेजार
महामार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घेतले असले तरी नाकातोंडात धूळ जाते. तसेच संपूर्ण अंगावर धूळ उडत असल्‍याने घामामुळे चिकचिक वाढते. वारंवार याचा त्रास होऊन दुचाकीस्वार बेजार झाले आहेत.

अवजड वाहने कारणीभूत
महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या वाहनांची चाके जाड व मोठी असल्‍याने खड्डे आणि खराब रस्त्यांवरून गेल्यास धुरळा उडतो. परिणाम या वाहनांच्या पाठीमागे व शेजारून जाणाऱ्या छोट्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होतो.

मुंबई-गोवा महामार्गावरून नियमित प्रवास करतो. माती-धूळ नाकातोंडात जात असल्‍याने खूप त्रास होतो. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. त्‍यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल.
- सुशील शिंदे, भाजप शहर अध्यक्ष, पाली

Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highway
Mumbai Goa Highway : महामार्गावर खड्ड्यातून एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com