१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग हा माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती
Updated on

गेल्या दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं (एन एच- ६६) काम अखेर अंतिम टप्प्यात आले. माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता उर्वरित महामार्ग आगामी मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, कंत्राटदारांच्या  हलगर्जीपणामुळे रखडलेल्या काही पुलांच्या कामांसाठी मात्र प्रवाशांना २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com