Vande Bharat Train : मुंबई- गोवा वंदे भारत ट्रेन धावणार शनिवारपासून

राज्यातील पाचवी आणि मुंबई ते गोव्यादरम्यान पहिली हायस्पीड वंदे भारत ट्रेन शनिवारपासून धावणार आहे.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSakal

मुंबई - राज्यातील पाचवी आणि मुंबई ते गोव्यादरम्यान पहिली हायस्पीड वंदे भारत ट्रेन शनिवारपासून धावणार आहे. या हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओद्वारे करणार आहे. उद्घाटनानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. प्रत्येक राज्यातून वंदे भारत चालविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

Vande Bharat Train
Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनात प्रीतम मुंडेंचा केंद्र सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

आता राज्याला पाचवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. पाचवी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा दरम्यान शनिवारपासून धावणार आहे. १६ मे रोजी सीएसएमटी-मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर शनिवार ३ जून रोजी मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्ष रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

असा असणार वेळ -

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. याशिवाय मंगळवार वगळता सर्व दिवस ही एक्सप्रेस धावणार आहे. भारतीय रेल्वे कडून वेळापत्रक जाहिर करण्यात आले नसले तरी हेच वेळापत्रक लागू होऊ शकते अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिले आहे.

Vande Bharat Train
Monsoon : राज्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी; ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

तिकिट दर?

मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांचा आवक्याचे बाहेर असणार आहे. या गाडीचे चेअर कार- १ हजार ५८०रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार- २ हजार ८७० रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. परंतु, हे तिकीट दर सध्या निश्चित केले असले तरी, प्रवाशांचा प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यता ही रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com