Mumbai: हाफकिनची लस सहा महिन्यांत बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाफकिनची लस

मुंबई : हाफकिनची लस सहा महिन्यांत बाजारात

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राने हैदराबाद स्थित लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकसोबत लस उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्माला मान्यता दिली होती. ही लस पुढील सहा महिन्यांत म्हणजेच मे महिन्यापर्यंत बाजारात दाखल होईल. तसेच, पहिल्या महिन्यातच लशीचे एक कोटी डोस बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

एप्रिलमध्ये केंद्र सरकारने राज्याच्या हाफकीन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनासाठी मंजुरी दिली होती. या मंजुरीनंतर हाफकीनने लसनिर्मितीच्या प्रक्रियेत जोर धरला. इथले कर्मचारी शिवाय इतर स्टाफ दिवस-रात्र या कामासाठी लागले आहेत.

हेही वाचा: Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

हाफकीनचे उत्पादन महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार म्हणाले, लसनिर्मितीसाठी सेफ्टी लॅबची गरज आहे. या सेफ्टी लॅबच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे. बीएसएल लॅबचे बांधकाम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. यानंतर या प्रयोगशाळेची चाचणी एका महिन्यासाठी म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत केली जाईल. ही प्रयोगशाळा आयसीएमआर आणि हाफकीनच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली बांधली जाईल. संपूर्ण महिनाभर प्रयोगशाळेच्या होणाऱ्या चाचणीमध्ये शास्त्रज्ञ एसओपीअंतर्गत प्रयोगशाळा बांधली गेली आहे की नाही हे तपासतील. लस उत्पादनात प्रयोगशाळा किती सुरक्षित आहे याचीही शास्त्रज्ञ चौकशी करतील.

लॅबच्या बांधणीनंतर फेब्रुवारीमध्ये लशीच्या तीन बॅच तयार होतील. लशीची तीन महिने स्थिरतेच्या गुणधर्मासाठी चाचणी केली जाईल. या स्थिरता चाचणीत लशीमध्ये कोणताही दोष आहे की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या तीन महिन्यांच्या चाचणीत परिणाम सकारात्मक आल्यास एप्रिलमध्ये लशीचे उत्पादन सुरू होईल आणि मे महिन्यात लस बाजारात उपलब्ध होईल.

सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्तेचा वापर करून लसनिर्मितीची क्षमता वाढवणे आणि त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमा राबवणे महत्त्वाचे आहे.

- सुभाष शंकरवार, महाव्यवस्थापक, हाफकिन उत्पादन

loading image
go to top