

Heavy rainfall in Mumbai leads to severe waterlogging
esakal
IMD Warns of More Heavy Rain in Coming Hours : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागांत २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.