मंत्रिमंडळ विस्ताराविरोधात याचिका करणाऱ्यांना सुनावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मंत्री पद देण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर संबंधित मंत्र्यांना निवडणुकीशिवाय मंत्री मंडळात स्थान देणे घटनाबाह्य आहे, असा दावा याचिकेत केला होता.

मुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना सुनावले. आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. 

माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मंत्री पद देण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर संबंधित मंत्र्यांना निवडणुकीशिवाय मंत्री मंडळात स्थान देणे घटनाबाह्य आहे, असा दावा याचिकेत केला होता.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. ही राजकीय याचिका आहे, राजकीय वाद राजकीय पद्धतीने हाताळायला हवेत, असे खंडपीठाने याचिकदारांना सुनावले. आगामी निवडणुकांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी घटनाबाह्य निर्णय घेतला आहे, तो रद्द करा अशी मागणी याचिकदारांनी केली आहे. सुरींदर अरोरा यांच्यासह तिघांनी याचिका केली आहे. याचिकेवर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High Court hearing on petition against Radhakrushna vikhe patil and Jayadatta Kshirsagar