
लैंगिक अत्याचार प्रकरणी गणेश नाईकांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होते. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा देखील झाला होता. त्यांना अटक होण्याची शक्यता होती. पण, आज मुंबई उच्च न्यायालायने (Bombay High Court) त्यांना अटकपूर्वी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ
एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आऱोप केले होते. ''गणेश नाईक यांनी माझ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. माझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला भाग पाडले. त्यामधून आम्हाला एक मुलगा देखील झाला. त्यानंतर आता गणेश नाईक मुलाला स्विकारण्यास नकार देत आहेत. ते आणि त्यांचा मुलगा मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी,'' असे आरोप महिलेने केले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानतंर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई पोलिस गणेश नाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होण्याची दाट शक्यता होती. मात्र, त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण, सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गणेश नाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच गणेश नाईक गेल्या अनेक दिवसांपासून नॉटरिचेबल होते. काही दिवसांनी डिएनए चाचणीसाठी तयार असल्याचं त्यांनी वकिलांमार्फत सांगितलं होतं. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
Web Title: Mumbai High Court Interim Bail To Ganesh Naik In Physical Absued Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..