Mumbai High Court : पत्नी तुमच्या चाकरीसाठी नाही, जेवण न बनवणे, सफाई न करणे क्रूरता नाही; उच्च न्यायालयाने पतीला फटकारले

Wife Cruelty Case : मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पत्नीने घरकाम न केल्यास ते मानसिक क्रूरता ठरत नाही. पत्नीला मोलकरणीसारखे वागवणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले.विवाह हा समानतेवर आधारित भागीदारी आहे, तो नोकरीचा करार नाही.
Mumbai High Court delivers a landmark judgment stating that a wife’s inability to perform household chores does not amount to mental cruelty in marriage.

Mumbai High Court delivers a landmark judgment stating that a wife’s inability to perform household chores does not amount to mental cruelty in marriage.

esakal

Updated on

मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच एका घटस्फोटाच्या खटल्याचा निकाल देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. पत्नीला मोलकरणीसारखे वागवणे मुर्खपणा आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. पत्नीला स्वयंपाक करता येत नाही किंवा तिला घराची साफसफाई करता येत नाही, केवळ या कारणावरून तिच्या वागणुकीचा अर्थ 'मानसिक क्रूरता' असा लावला जाऊ शकत नाही आणि हे घटस्फोटाचे वैध कारण ठरू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com