तेराशे शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - तेराशे शाळा बंद होत असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावलेल्या नोटिशीने राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आनंदी झाले आहेत. या नोटिशीला कायदेशीर उत्तर दिले जाईल; शिवाय आपला निर्णय योग्य रीतीने आयोगासमोर मांडता येईल, असा विश्‍वास तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

मुंबई - तेराशे शाळा बंद होत असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावलेल्या नोटिशीने राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आनंदी झाले आहेत. या नोटिशीला कायदेशीर उत्तर दिले जाईल; शिवाय आपला निर्णय योग्य रीतीने आयोगासमोर मांडता येईल, असा विश्‍वास तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

चर्चगेट येथील सिडनॅहॅम महाविद्यालयात पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. प्रसारमाध्यमांतील बातम्यांच्या निकषांवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तेराशे शाळा बंद होत असल्याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आल्याने आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची योग्य संधी मिळाली आहे. आता प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचा आधार या प्रक्रियेत राहणार नाही, याबद्दल तावडे यांनी समाधान व्यक्त केले. आयोगाच्या नोटिशीला शिक्षण हक्क आयोगाचा आधार घेऊन उत्तर देण्यात येईल. शिक्षण विभागाची बाजू व्यवस्थित मांडल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय योग्य असल्याचे आयोगाला पटेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

तेराशे शाळा बंदच झाल्याच्या बतावण्या झाल्याने हा वाद वाढल्याचे तावडे यांनी सांगितले. यापैकी केवळ 257 शाळांचे स्थलांतर झाले आहे. या शाळांचे स्थलांतर शिक्षण हक्क कायद्यानुसार झाले आहे. 280 शाळांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे; तर उर्वरित 755 शाळांच्या विविध मुद्द्यांवर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. शाळांच्या स्थलांतरामुळे शिक्षकांचेही स्थलांतर होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. दूरवर शाळा मिळाल्या असल्या, तरीही पावसाळ्यात जुन्याच शाळांमध्ये वर्ग भरवले जातील. त्यासाठी नव्या शाळांमध्ये जाण्याची आवश्‍यकता नाही, असेही ते म्हणाले.

नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बारावीच्या प्रश्‍नपत्रिकेला दोन पर्याय देण्यावर शिक्षण मंडळाशी चर्चा सुरू आहे. नवीन वर्षात शिक्षकांसाठी कॅशलेश मेडिक्‍लेम सेवा सुरू करण्यात येईल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Web Title: mumbai maharashtra news 1300 school close