राज्यात तेराशे आधार नोंदणी केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - राज्यात मार्चअखेरीस 1293 आधार नोंदणी केंद्रांची सुरवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधार नोंदणीसोबतच या ठिकाणी आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करणेही शक्‍य होईल. आतापर्यंत पोस्टाच्या 447 कार्यालयांत आधार नोंदणी सेवेची सुरवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी मार्चअखेरीस आधार नोंदणी सुरू होईल. कोकण, मराठवाडा, विदर्भातील विविध जिल्ह्यांत ही आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत पोस्टाच्या कार्यालयांत एक लाख 63 हजार 335 नागरिकांनी आधार अपडेशन आणि आधार नोंदणीच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. मुंबई 194 ठिकाणी, नवी मुंबईत 118 ठिकाणी; तर पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि सातारा अशा तिन्ही ठिकाणी मिळून पोस्टाच्या 87 केंद्रांद्वारे या सेवेची सुरवात केली आहे.

Web Title: mumbai maharashtra news aadhar registration center