रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आता वाढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचविण्यासाठी उपयुक्त असलेल्या रुग्णवाहिकेचा सायरन आता 120 डेसिबलपर्यंत वाजणार आहे.

मुंबई - रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचविण्यासाठी उपयुक्त असलेल्या रुग्णवाहिकेचा सायरन आता 120 डेसिबलपर्यंत वाजणार आहे.

ट्रॅफिकमधून मार्ग काढताना रुग्णवाहिकांना निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून, रुग्णवाहिकेचा सायरन 110 ते 120 डेसिबलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेऊन रुग्णवाहिकेच्या सायरनच्या वाढीव डेसिबल मर्यादेची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यभरात फिरणाऱ्या रुग्णवाहिकेला यापूर्वी 65 ते 75 डेसिबलपर्यंतच्या सायरनचा वापर करण्यास परवानगी होती; मात्र हा आवाज ट्रॅफिकमधील वाहनांच्या आवाजामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलिसांपर्यंत पोचणे कठीण होते. तो आवाज वाढवलला जावा, यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पत्र पाठविले. त्यानुसार सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारककडून यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे.

सिग्नलपर्यंत जाणार रुग्णवाहिकेचा आवाज
सरकारने 110 ते 120 डेसिबलपर्यंत सायरनची मर्यादा वाढविल्याने रुग्णवाहिका कोणत्याही लेनमध्ये आणि सिग्नलपासून कितीही लांब अंतरावर असली तरी तिचा आवाज सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना ऐकायला येणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णलयात पोचणे शक्‍य होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Web Title: mumbai maharashtra news ambulance siren sound increase