भाजपध्यक्ष शहा घेणार घटकपक्षांसोबत बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 जून 2017

मुदतपूर्व निवडणुकीची चाचपणी करणार
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्यापासून (ता. 16) तीन दिवस मुंबई दौऱ्यावर असून यादरम्यान ते घटक पक्षांच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. या बैठकीमुळे शहा मुदतपूर्व निवडणुकीची चाचपणीही करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अमित शहा मुंबईत आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार-खासदार आणि मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. शहा यांचा दौरा पक्षाचा आढावा घेण्यासाठी असल्याचे भाजपमधून सांगण्यात येत असले, तरी शहा घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाच्या माध्यमातून मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर असून शिवसेनेच्या सततच्या टिकेला भाजप नेते वैतागले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विषय कायमचा बंद करण्यासाठी मुदतपूर्व निवडणूक घेऊन स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

अमित शहा पक्षांच्या नेत्यांसाबत संवाद साधणार असले तरी "एनडीए'च्या घटक पक्षांची ते स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती रासपचे अध्यक्ष दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

"सह्याद्री' अतिथीगृहात होणाऱ्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

Web Title: mumbai maharashtra news amit shaha meeting with other party