खाद्यपदार्थांच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत मंगळवारी सादर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात सुरू असलेली हुक्का पार्लर खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या हॉटेलांत चालवता येणार नाहीत. तसेच बेकायदा हुक्का चालविल्यास संबंधितांना शिक्षा होणार आहे.

राज्याच्या मेट्रो शहरात हल्ली जागोजागी हुक्का पार्लर उघडली आहेत. त्याकडे अल्पवयीन मुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. या हुक्कामध्ये तंबाखूचा वापर होतो. तसेच त्याच्या अडून अनेक गैरधंदे चालविले जात आहेत. मात्र हुक्का पार्लरवर कारवाईसाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता, त्यामुळे हुक्का पार्लरवर कारवाई करता येत नव्हती.

मुंबईत डिसेंबरमध्ये हुक्का पार्लरमुळे कमला मील कंपाउंडमधील हॉटेलमध्ये मोठी आग लागली होती. त्यामध्ये अनेक ग्राहकांना जीव गमवावा लागला होता. या सुधारणा कायद्यामुळे हुक्का पार्लरसंदर्भात कायदा अस्तित्वात येणार आहे. त्या कायद्यान्वये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या हॉटेलमध्ये हुक्का चालवता येणार नाही.

कैद किंवा दंडाची शिक्षा
या कायद्यान्वये अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस यांना तपासणीचे अधिकार राहणार आहेत. तसेच नियमाला बगल देऊन हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना एक ते तीन वर्षांपर्यंत कैद होईल किंवा मोठा दंड करण्याची तरतूद या सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे.

Web Title: mumbai maharashtra news ban on hukka parlour in hotel