डीबीटी, महावास्तू पोर्टलमुळे पारदर्शी व गतिमान कारभार - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - "महाडीबीटी' व "महावास्तू' पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी व गतिमान सेवा मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. सरकारच्या अनेक योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी या दोन पोर्टलचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.

या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंधारणमंत्री राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'या योजनेमुळे गतिमान सेवा मिळण्यास मदत होईल. योग्य आणि गरजू लाभार्थींपर्यंत पारदर्शीपणे मदत पोचेल. महावास्तू पोर्टलमुळे घरबांधणीसाठी नकाशा मंजूर करणे; तसेच इतर बांधकामे करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळणे सोपे होईल. सामान्य माणसाला परवानगीसाठी देण्यात आलेल्या आपल्या प्रस्तावाचे शेवटपर्यंत ट्रॅकिंग करता येईल. डिसेंबरपर्यंत तीन टप्प्यांत ही योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत सुरू होईल.

Web Title: mumbai maharashtra news devendra fadnavis talking