दिलीपकुमार यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना बुधवारी (ता. 2) वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्‍टरांनी सांगितले, की त्यांना मूत्रपिंडाची समस्या आहे. दिलीपकुमार यांची भाची शाहीनने सांगितले, की दिलीपकुमार यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा होत आहे.

दिलीपकुमार यांना अतिसाराचा त्रास होऊन शरीरातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे मूत्रपिंडावर ताण पडला आणि तब्येत अधिक बिघडली. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनंतर त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलवले जाईल. साधारण आठवडाभर त्यांना रुग्णालयात ठेवावे लागेल.

Web Title: mumbai maharashtra news dilip kumar health Improvement