झोपड्यांवर "आता ड्रोन'ची नजर

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - काही ठिकाणी अरुंद गल्ल्या, तर काही ठिकाणी मजल्यावर मजले अशी अवस्था असल्याने नेमक्‍या झोपड्या किती आणि कुठे थाटल्या आहेत, हे शोधणे मुश्‍किल होते. यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एआरए) राबवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते; तसेच नगरनियोजनही कोलमडते. हे सर्व टाळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी झोपड्यांचा अचूक सर्व्हे करण्यासाठी "ड्रोन'चा वापर करण्याची शक्‍कल लढवली आहे. यामुळे झोपड्यांवर "ड्रोन'ची नजर राहणार आहे.

ज्या ठिकाणी साधा प्रकाशही पोचत नाही अशा ठिकाणचे अचूक सर्वेक्षण केल्याने झोपडीदादांची "एसआरए' योजनेतील घुसखोरीदेखील कमी होणार आहे. शिवाय अनधिकृत झोपड्यांची यादी घुसवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या विकसकांवरदेखील गंडांतर येणार आहे. सर्व्हेला सुरवात झाली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या "ड्रोन'च्या साहाय्याने वेगवेगळ्या पाच पद्धतीने झोपड्यांची छायाचित्रे घेता येतात. या "ड्रोन'च्या कॅमेऱ्यांची 20 मेगा पिक्‍सेल इतकी क्षमता असून, अशाप्रकारचे ड्रोन युद्धात बारीक नजर ठेवण्यासाठी वापरले जातात. शिवाय हे अत्यंत कमी उंचीवर येऊन त्यांचे काम करू शकतील अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news dron watch on slum