शिक्षणात महाराष्ट्र नंबर वन!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जानेवारी 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारने उच्च शिक्षणाबाबत केलेल्या सर्वेक्षण पाहणीत तंत्रशिक्षण, दूरशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आदी क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. भारतातील उच्च शिक्षणाची सद्यःस्थिती दर्शविणारा ‘एआयएसएचई २०१६-१७’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे दिल्लीत प्रकाशन झाले. 

देशातील ३ हजार ६७२  तंत्रशिक्षण महाविद्यालयांपैकी ६६७ महाराष्ट्रात आहेत. त्यात २ लाख ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

‘तंत्रशिक्षणा’तील प्रवेशांबाबत मात्र तमिळनाडूने महाराष्ट्रावर आघाडी घेताना प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल असून, राज्यात ९ लाख ४० हजार ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तमिळनाडू ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या, तर दिल्ली ७ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशांसह देशात तिसऱ्या स्थानावर आहे. 

दूरशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. देशातील ४० लाख ८९ हजार ७८१ विद्यार्थीसंख्येत राज्याचा १७.१ टक्के वाटा असून, सुमारे ७ लाख विद्यार्थी दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. 

देशातील सर्वाधिक म्हणजे ४ हजार ३०८ शिक्षक प्रशिक्षण संस्था (बीएड-डीएड महाविद्यालये) एकट्या महाराष्ट्रात आहेत. तेथील विद्यार्थी संख्येतही महाराष्ट्र अव्वल असून, एकूण ३९ हजार ६५७ विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. यात २९ हजार ८२२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मुलींच्या प्रवेशामध्ये तमिळनाडू अव्वल ठरले असून, राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

राज्यातील तीन जिल्ह्यांत सर्वाधिक महाविद्यालये
सर्वाधिक महाविद्यालये असणारे देशात १० जिल्हे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशपातळीवर याबाबतीत बंगळूर १०२५ महाविद्यालयांसह प्रथम क्रमांकावर, तर पुण्यात ४२१, नागपूरमध्ये ३३२, तर मुंबईत ३२२ महाविद्यालये अशी एकूण १०७५ महाविद्यालये या तीन जिल्ह्यांत आहेत.

Web Title: mumbai maharashtra news maharashtra number one in education