केसरकरांची प्रकरणे उघडकीस आणू - नितेश राणे

केसरकरांची प्रकरणे उघडकीस आणू - नितेश राणे

मुंबई - गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रकरणे लवकरच उघडकीस आणू, असा इशारा नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून दिला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे आमदार आणि राणे यांचे पुत्र नितेश यांनी ट्विटरवरून केसरकर यांना इशारा दिला आहे.

"केसरकर तुम्ही विषय सुरू केलात, आता त्याचा शेवट आम्ही करणार', असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. "मांजर दूध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की, मला कोणीही पाहत नाही', असे केसरकरांना वाटत आहे. मात्र, केसरकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मदतीने महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात केलेल्या भानगडी आगामी अधिवेशनात उघडकीस आणणार', असा इशारा नितेश यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com