म्हाडाने परत घेतलेला भूखंड पुन्हा विकसकाला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

विखे-पाटील यांचा प्रकाश महेतांवर खळबळजनक आरोप
मुंबई - म्हाडाने खासगी विकसकाकडून परत घेतलेला भूखंड राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी पुन्हा त्याच विकसकाला नियम धाब्यावर बसवून दिल्याचे प्रकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उघड केले आहे.

विखे-पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की घाटकोपरमधील पंतनगर येथील सीटीएस क्र. 194 हा 18 हजार 902 चौरस मीटरचा भूखंड 1999 मध्ये निर्मल होल्डिंग प्रा. लि. या विकसकाला पुनर्विकसित करण्यासाठी देण्यात आला होता; मात्र त्याने कोणताच प्रतिसाद न दिल्याने म्हाडाने 2006 मध्ये हा भूखंड परत घेतला.

गृहनिर्माणमंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हा भूखंड पुन्हा त्याच विकसकाला दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने गृहनिर्माणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. हा भूखंड पुन्हा त्याच विकसकाला देण्यास नकार देणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली, अशी माहितीही विखे-पाटील यांनी दिली आहे.

Web Title: mumbai maharashtra news Rebuilding the plot taken by MHADA