आरक्षण स्मरण यात्रेला आजपासून सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाने धनगर आरक्षणाचे केवळ गाजर दाखवले. धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. ते पाळले गेले नाही. सरकारला याचे स्मरण करून देण्यासाठी उद्यापासून (ता.15 ते 21 जुलै) पुढील आठवडाभर पंढरपूर (सोलापूर) ते बारामती (पुणे) अशी स्मरण यात्रा धनगर समाजाकडून काढली जाणार आहे.

धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर बरोबर तीन वर्षांपूर्वी याच तारखेला म्हणजे 15 जुलै 2014 रोजी पंढरपूरपासून आरक्षण यात्रेचे आयोजन केले होते. ही यात्रा मजल दरमजल करीत बारामती येथे पोचली होती. त्या वेळच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने धनगर समाजाचे आरक्षण नाकारले होते. त्यामुळे धनगर समाजाने त्या वेळचा पक्ष आणि सध्याचा सत्ताधारी पक्ष भाजपस पाठिंबा दिला होता. तसेच 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा प्रश्‍न सोडवू, असे भाजप नेत्यांनी बारामतीच्या सभेत धनगर बांधवांना सांगितले होते. मात्र आता त्यांना विसर पडला आहे, असे या स्मरण यात्रेचे आयोजक नवनाथ पडळकर यांनी म्हटले आहे.

Web Title: mumbai maharashtra news reservation smaran yatra start