भंडाऱ्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडून काढले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षावर सत्तेत राहून सतत टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी धोबीपछाड दिला. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत यांच्याकडून काढत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ते देण्यात आले.

सामान्य प्रशासन विभागाने आज अधिकृत आदेश काढत बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड जाहीर केली. सध्या बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. दीपक सावंत यांच्यासोबत ते भंडाऱ्याचे सहपालकमंत्री होते. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बावनकुळे यांची भंडारा पालकमंत्रिपदी नेमणूक करीत राजकीय कुरघोडी केल्याचे मानले जाते.

भंडारा व गोंदिया असा लोकसभेचा एकत्र मतदारसंघ आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे असल्याने आगामी पोटनिवडणूक व एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात विरोधकांना शह देण्याची खेळी म्हणून याकडे पाहिले जाते. भंडारा जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा परिषदेत सत्ता आहे. आजच येथे जिल्हाध्यक्ष व उपजिल्हाध्यक्षांची निवड झाली आहे. गोंदियात भाजप - कॉंग्रेस युतीने सत्ता कायम राखत "राष्ट्रवादी'ला बगल दिली आहे.

Web Title: mumbai maharashtra news Shivsena removed the Guardian Minister post of the Bhandara