शिवसेनेचाही शेतकऱ्यांना पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - महाराष्ट्रात सुरू झालल्या शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी शुक्रवारी केली. संपकरी शेतकऱ्यांवर आज ठिकठिकाणी झालेल्या कारवाईचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांना मारणे योग्य नाही, अशी भूमिका घेतली.

शिवसेनेने या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय अप्रत्यक्षरीत्या घेतला आहे. संपाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना मदत करण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबले आहे असे समजते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आपण आक्रमक झालो, तर या संपाला प्रतिसाद मिळेल, असा शिवसेनेचा अंदाज आहे. शिवसेनेतील छोट्या-मोठ्या नेत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शेतकरी संपाला पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली आहे. दूध संघ; तसेच खरेदी-विक्री संघांच्या निवडणुकांत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. आगामी काळात महाराष्ट्रात पाय रोवून उभे रहायचे असेल तर हा मुद्दा अत्यंत उपयोगाचा आहे, असे शिवसेना नेत्यांचे मत आहे.

संभाजीराजेंचाही पाठिंबा
भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून राज्यसभेवर नेमण्यात आलेल्या कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनीही आज अचानक शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सहकारी पक्षांपाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केल्याने भाजपची अडचण झाली आहे.

काही जणांना आपण सत्तेत आहोत, हे समजत नाही. त्यांना जबाबदारीही कळत नाही; पण आम्हाला ती कळते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: mumbai maharashtra news shivsena support to farmer