साखरेचे दर स्थिर राहणार - पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - सर्वसामान्य नागरिकाला सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी, या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणली असल्याचे सांगून साखरेचे दर स्थिर राहतील, असे प्रतिपादन साखर संघाच्या संचालिका आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केले.

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने तीनदिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना पंकजा मुंडे यांनी साखरेच्या साठ्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचे जोरदार समर्थन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ते गैरहजर राहिले. या वेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील तसेच माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले. साखर उद्योगाचे स्वरूप हंगामी असल्याने त्याबाबत दीर्घकालीन धोरण आखणे शक्‍य नाही. परदेशात 192 दिवसांचा हंगाम असला तरी भारतात तशी परिस्थिती नाही. बीडसारख्या दुष्काळी भागात पाण्याअभावी काही वर्षे अवघ्या 25 ते 30 दिवसांचे हंगाम झाले. त्यामुळे 40 रुपयांचा दर 45 रुपये झाला तर निश्‍चितच फरक पडतो. रेशनिंग दुकानातील साखर घेणाऱ्या गरीब घटकासाठी पाच रुपयांचा हा फरकसुद्धा खूप मोठा ठरतो, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

Web Title: mumbai maharashtra news sugar prices remain steady