ऊसदरासाठी आज मंत्र्यांसोबत बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - उसाचा दर किमान तीन हजार 500 रुपये असावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. दरनिश्‍चितीसाठी गुरुवारी (ता. 2) बैठक होणार आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत ही बैठक होत आहे.

मुंबई - उसाचा दर किमान तीन हजार 500 रुपये असावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. दरनिश्‍चितीसाठी गुरुवारी (ता. 2) बैठक होणार आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत ही बैठक होत आहे.

साखर कारखानदार दहा वर्षांपासून ऊस उत्पादकांना कमी दर देत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांनी केली आहे. भाजप सरकारने "एफआरपी' जाहीर केली असली, तरी बहुतांश साखर कारखाने साखर उतारा 12 असेल तरी 11 दाखवतात. त्यामुळे सरकारने दर मिळतात की नाही हे तपासण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. कारखान्याजवळ अर्धा किलोमीटर परिसरात सरकारने वजनकाटा ठेवावा आणि कारखान्याच्या वजनकाट्यावरील नोंद कमी असेल तर कारखान्यावर कारवाई करावी, अशा मागण्याही बैठकीत करण्यात येणार आहे. या मागण्या मान्य न झाल्यास संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: mumbai maharashtra news sugarcane rate meeting with minister