"यूपी'च्या आखाड्यात मुंबई महापौरपदाचे पडसाद 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - राजधानी मुंबईच्या महापौर पदासाठीच्या निवडीचे पडसाद थेट उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमटविण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. मुंबईत भाजपला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्‍यता असल्याची चर्चा सुरू झाल्याने याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहे. 

कॉंग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्याची चर्चा मुंबईत सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी सुरवातीला मौन बाळगल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले. माजी खासदार गुरुदास कामत यांनी तर थेट राहुल गांधींना पत्र पाठवून शिवसेनेसोबत युती नको, अशी विनंती केल्यानंतर तर याचे पडसाद थेट राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांत उमटले. 

राज्यातल्या भाजप नेत्यांनी मात्र यावर काहीही बोलायचे नाही, अशी भूमिका घेत उत्तर प्रदेशातील निवडणुकीत कॉंग्रेसची कोंडी होईल, याकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिले. 

मुंबईतल्या या राजकीय युतीचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेशात उमटण्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेसोबत कॉंग्रेस युती करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, त्या अगोदरच सोशल मीडियातून कॉंग्रेसच्या या कथित भूमिकेचा जोरदार प्रसार व प्रचार उत्तर प्रदेशात सुरू झाला होता.

Web Title: Mumbai mayor politics reaction on up election