

राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मान्सूनच्या पावसाची आतुरता लागली आहे. मुंबईतील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. दरम्यान रखडलेला मान्सून मुंबईत २० जूनला दाखल होण्याचा शक्यता होती मात्र मान्सूनचा प्रवास आणखी लांबला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून मुंबईत आता २२ ते २९ जूनच्या दरम्यान मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे.