मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित

मिलिंद तांबे
सोमवार, 24 जून 2019

सर्वसामान्यांवर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कायद्याचा दंडुका उगारणारी महापालिका मंत्र्यांच्या ठाकबाकीबाबत गप्प का आहे...?..जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सर्वसामान्य जनतेने का भरावी ? तसेच महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का याच उत्तर द्यावे.
- शकील अहमद , आरटीआय कार्यकर्ते

मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. तसेच सदर  बंगल्याला पालिकेने डीफॉल्टर यादीत टाकले असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिके कडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागितली होती. सदर माहिती संदर्भात जन माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे.या माहितीनुसार मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पाण्याची एकूण 8 कोटींची  थकबाकी आहे. तसेच इतर मंत्री ज्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची थकबाकी आहे.

त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, (सेवासदन), गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता (पर्णकुटी), ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्ये मंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी),  परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा, रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृह, व इतर शासकीय आवासांची नावे आहेत.

कोणत्या  मंत्र्यांच्या आवासवर किती पाण्याची थकबाकी?
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, वर्षा
एकूण थकबाकी : रु. 744981 रु.

- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री, देवगिरी
एकूण थकबाकी : 145055 रु.

- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री, सेवासदन
एकूण थकबाकी : 161719 रु.

- पंकजा मुंडे, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री रॉयलस्टोन
एकूण थकबाकी : 35033 रु.

- विष्णू सावरा, आदिवासी मंत्री, सागर
एकूण थकबाकी : 182141 रु.   

- गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्येमंत्री, ज्ञानेश्वरी
एकूण थकबाकी : 59778 रु.

- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण जलसंपदा मंत्री, शिवनेरी
एकूण थकबाकी : 105484 रु.

- परिवहन मंत्री दिवाकर रावते, मेघदूत 
एकूण थकबाकी : 105484 रु.

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन     
एकूण थकबाकी : 249243 रु.

- रामदास कदम, पर्यावरण मंत्री, शिवगिरी
एकूण थकबाकी : 8988 रु.

- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), नंदनवन
एकूण थकबाकी : 228424 रु.

- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री, जेतवन 
एकूण थकबाकी : 614854 रु.

- डॉ. दीपक सावंत, सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, चित्रकुट 
एकूण थकबाकी : 106296 रु.

- महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागीरी 
एकूण थकबाकी : 173497 रु.

- एकनाथ खडसे, रामटेक 
एकूण थकबाकी : 218998 रु.

- मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी, तोरणा             
एकूण थकबाकी : 10682 रु.

- रामराजेे निंबाळकर, विधानसभा सभापती, अजंथा  
एकुण थकबाकी :1204390 रु.

सर्वसामान्यांवर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कायद्याचा दंडुका उगारणारी महापालिका मंत्र्यांच्या ठाकबाकीबाबत गप्प का आहे...?..जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सर्वसामान्य जनतेने का भरावी ? तसेच महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का याच उत्तर द्यावे.
- शकील अहमद , आरटीआय कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Municipal corporation declares CM Devendra Fadnavis varsha bunglow defaulter