खरा मुस्लिम "वंदे मातरम्‌' बोलणार नाही - अबू आझमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - ""खरा मुस्लिम कधीही "वंदे मातरम्‌' बोलणार नाही, कारण इस्लाममध्ये अल्लाशिवाय इतर कोणालाही पूजता येत नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते अबू आझमी यांनी शुक्रवारी केले. 

तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये "वंदे मातरम्‌' हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला होता. के. वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. याविषयी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी व "एमआयएम'चे आमदार वारिस पठाण यांनी आपले मते व्यक्त केली आहेत. 

अबू आझमी म्हणाले, की खरा मुस्लिम नागरिक "वंदे मातरम्‌' कधीच बोलणार नाही. मी वंदे मातरम्‌चा मान ठेवतो, पण कधीही वंदे मातरम्‌ गाणार नाही. 

वारिस पठाण म्हणाले, ""मद्रास उच्च न्यायालयाने "वंदे मातरम्‌'बद्दल जो निर्णय दिला आहे, त्या संदर्भात आमचे म्हणणे आहे, की आम्ही संविधानला मानणारे आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत. संविधानात कुठेही लिहिलेले नाही, की "वंदे मातरम्‌' म्हणायला हवे. माझ्या गळ्यावर सुरी ठेवा किंवा डोक्‍यावर बंदूक ठेवा पण "वंदे मातरम्‌' नाही बोलणार. 

त्यांनी निघून जावे - रावते 
"वंदे मातरम्‌' बोलण्याबाबत सुरी ठेवायचा प्रश्न नाही. पण ज्यांना लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून इथून निघून जावे ही आमची मातृभूमी आहे. "वंदे मातरम्‌' या भूमीला स्वतंत्र करणारे गीत आहे. त्यांना याचा आदर करणे जड जात असेल, तर त्यांनी निघून जावे, असा इशारा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिला.

Web Title: mumbai news abu azmi Vande Mataram samajwadi party muslim