मुंबई-शिर्डी अवघ्या 40 मिनिटांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई ते शिर्डी हा विमान प्रवास आता केवळ 40 मिनिटांत करता येणार आहे. या मार्गावरील विमानसेवेची पहिली चाचणी आज जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली.

मुंबई - मुंबई ते शिर्डी हा विमान प्रवास आता केवळ 40 मिनिटांत करता येणार आहे. या मार्गावरील विमानसेवेची पहिली चाचणी आज जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली.

मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावरून अलायन्स एअरवेजचे विमान संध्याकाळी चारच्या सुमारास शिर्डीच्या दिशेने झेपावले; ते 4.45च्या सुमारास शिर्डीनजीकच्या काकडी गावातील विमानतळावर उतरले. या विमानतळासाठी 1350 एकर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. एक ऑक्‍टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे. तेथून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ अशा सहा फेऱ्या रोज होणार आहेत.

Web Title: mumbai news aeroplane journey