हातगाडीवर दुचाकी ओढत सरकारचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई  - आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑइलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ह्यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात आले. हातगाडीवर दुचाकी बांधून तर चारचाकी ओढत राष्ट्रवादीच्या महिलांनी मंत्रालयासमोर अभिनव पद्धतीने आंदोलन केले. 

मंत्रालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चारचाकी गाडी हाताने ओढणाऱ्या महिला कार्यकर्त्या पाहून पोलिसांची धावपळ उडाली. या आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. महाराष्ट्रात सलग दोन वर्षे समाधानकारक पाऊस असताना सरकार मात्र पेट्रोल वर दुष्काळ कर आकारून जनतेची लूट करत आहे. एक लिटरच्या मागे सरकार 11 रुपयांचा दुष्काळी कर जमा करत असल्यानेच पेट्रोलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. 

महागाई कमी करण्याचे आश्वासन देत एनडीए सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुगीचे दिवस येणार आहेत हे सरकारने जाहीर करावे, असे आवाहन वाघ यांनी केले. दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय, असा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम सरकारने बंद करावे, असा इशाराही वाघ यांनी दिला.

Web Title: mumbai news chitra wagh ncp oil