नोटबंदीची "आंधळी कोशिंबीर'..! 

सोमवार, 25 जून 2018

मुंबई - काळ्या पैशाविरोधात केंद्र सरकारने सुरू केलेली नोटबंदी केवळ "आंधळी कोशिंबीर'चा खेळ झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तब्बल 1.33 लाख खात्यांमधे 2.89 लाख कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमा झाल्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा दावा माहिती अधिकारातून फोल ठरला आहे. सन 2017-18 मध्ये केवळ 997.19 कोटी रुपये संशयास्पद असल्याने जप्त करण्यात आले असून काळ्या पैशाच्या विरोधात एकही फौजदारी गुन्हा अथवा अटक झालेली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. 

जितेंद्र घाडगे यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे नोटबंदी नंतर कारवाई करण्यात आलेली बेहिशेबी रक्कम, त्या रकमेचे स्रोत, रक्कम असलेल्या व्यक्ती, संस्थाची यादी व कारवाई याबाबत माहितीचा अधिकार टाकला होता. घाडगे यांना प्रत्यक्ष नोटबंदी नंतर संपूर्ण कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ही धक्कादायक अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्रालयाने 2016 मधे प्रसिद्धीपत्रकात 17500 कोटी अघोषित संपत्ती आढळून आल्याचे घोषित केले होते. तर 1003 कोटी जप्त केल्याची माहिती पत्रकात दिली होती. मात्र जितेंद्र घाडगे यांना दिलेल्या उत्तरातील माहिती व अर्थमंत्रालयाचे प्रसिद्धीपत्रक यांत तफावत असल्याने नोटबंदीच्या निर्णयाची चिरफाड सुरू आहे. 

देशभरात केवळ 997 कोटी रुपये जप्त 
​11,120 संशयास्पद व्यवहारांची तपासणी 
माहिती अधिकारात सरकारचे दावे फोल 
2.89 लाख कोटी बेहिशोबी रक्कम नाही 
1.33 लाख खातेदारांचाही दावा खोटा 

Web Title: mumbai news Currency Ban black money

टॅग्स