गणेशभक्तांना मदतीस प्रशासन सज्ज - केसरकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई  - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक महामार्गावर पोलिस, परिवहन तसेच स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी तैनात आहेत, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

भाविकांसाठी सोयीसुविधांसंदर्भात केसरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कोकणचे विभागीय आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकणातील सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, मुंबईतील वाहतूक पोलिस अधिकारी, परिवहन अधिकारी उपस्थित होते. 

केसरकर यांनी सांगितले, की कोकणात जाणाऱ्या सर्व मार्गांवर टोलमाफी करण्यात आली आहे. त्यासाठी पास देण्याची व्यवस्था मुंबई, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथील पोलिस ठाण्यांमध्ये आणि वाहतूक पोलिसांच्या केंद्रांवर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी 24 तास कार्यरत असतील. प्रत्येक महामार्गावर केंद्र उभारण्यात आले आहे. कोकणामध्ये आपत्कालीन यंत्रणेलाही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आवश्‍यक औषधसाठा ठेवण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबईमध्ये सात ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे व नवी मुंबईतही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग अरुंद असल्यामुळे भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: mumbai news ganeshotsav deepak kesarkar