सरकारी जमीन हडपली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - सायन-पनवेल महामार्गालगतची तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तीने परस्पर विकल्याची कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सोमवारी दिली.

या संदर्भात शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तारांकित प्रश्न विचारला असता पाटील बोलत होते. सायन-पनवेल महामार्गासाठी सरकारने 1965मध्ये संपादित केलेल्या तुर्भे येथील दोन हेक्‍टर 88 आर या जमिनीतील शिल्लक एक हेक्‍टर 70 आर इतकी जमीन सरकारने मूळ मालकाला परत केल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवून पुण्यातील एका गुंतवणूकदारासोबत 15 कोटींचा व्यवहार करून विजय बाबू पाटील आणि अन्य 38 जणांनी सरकारची फसवणूक केली आहे. याबाबत नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र सदरच्या जमिनीचा सातबारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा गैरव्यवहार होताना नोंदणी विभागातील अधिकारी सहभागी होते किंवा नाही याबाबत योग्य चौकशी करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Web Title: mumbai news government place acquire