'ब्लू व्हेल'वर बंदीसाठी केंद्राला शिफारस करू - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - इंटरनेट आणि मोबाईल गेमिंगमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारा "ब्लू व्हेल' गेम बंद करावा, अशी विनंतीवजा शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंधेरीत मनप्रीतसिंग या मुलाचा "ब्लू व्हेल' गेममुळे झालेल्या करुण अंताचा उल्लेख केला.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या खेळामुळे आजपर्यंत जगाच्या वेगवेगळ्या भागांत 100 मृत्यू झाले आहेत. आता हा प्रकार मुंबईतून भारतात शिरतो आहे, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. युरोपातील एका मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेल्या व्यक्तीने हा खेळ शोधून काढला आहे. त्यात सुमारे 50 दिवस खेळणाऱ्याला छोट्या-मोठ्या सूचना केल्या जातात. त्याचा अंतिम हेतू खेळणाऱ्याला आत्महत्या करण्याची आज्ञा देणे, हा असतो असेही त्यांनी सांगितले. अंधेरीत राहणाऱ्या मनप्रीतनेही या खेळाच्या प्रभावात येऊन इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरून आत्महत्या केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार अत्यंत दुर्दैवी तसेच गंभीर असल्याचे नमूद केले. अशा ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याचे अधिकार सरकारला असतात, त्यामुळे त्या प्रकारची शिफारस करण्याचे आश्‍वासन देत केंद्र सरकारला त्वरित पाठवण्याचे मान्य केले.

Web Title: mumbai news I would recommend the center to ban blue veil game