मारहाण व धमकावल्याबाबत इंद्राणीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने तुरुंगात मारहाण झाल्याची तक्रार बुधवारी (ता. २८) रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली. मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी मारहाण करून धमकावल्याचा आरोप तिने यात केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

मुखर्जी हिने केलेल्या तक्रारीबाबत पोलिस तपास करणार आहेत, त्यात मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी दुपारी इंद्राणीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते, तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी तिला काठीने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. शेट्ये हिच्या मृत्यूची माहिती उघड केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असेही धमकावण्यात आल्याचेही इंद्राणीने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: mumbai news Indrani Mukherjee