कीटकनाशकांवरील बंदीची मुदत संपली; पुढे काय? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई -  यवतमाळ शेतकरी विषबाधेनंतर पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर घातलेली बंदीची 60 दिवसांची मुदत संपल्यानंतरही पुढील आदेश मिळालेले नाहीत. चौकशी समितीचा अहवालही गुलदस्त्यात असल्याने शेतकरी व कीटकनाशक उत्पादक भांबावले आहेत. यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये या पाच कीटकनाशकांच्या विक्री, वितरण व वापरावर बंदी होती. 

कीटकनाशक फवारणीतील शेतकऱ्यांच्या मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी पश्‍चिम विदर्भात प्रोफेनोफोस, फीप्रोनील, ऍसिफेट, डिफेन्थीरोन व मोनोक्रोटोफॉस या पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर ही बंदी घातली होती. क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीएफआय)ने या संदर्भात एसआयटी अहवाल मिळावा, अशी माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. अद्याप त्यासंबंधीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

... फवारणी मिश्रणाची आंघोळ 
सीसीएफआयचे राजू श्रॉफ म्हणाले की, 19 मृत शेतकऱ्यांपैकी दोन शेतकरी श्‍वासोच्छ्वासात बाधा आल्याने मृत झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचा मृत्यू कीटकनाशक सेवन व मद्यसेवनाने झाल्याचे पोस्टमोर्टेम अहवालात नमूद करण्यात आले आहे. परंतु कीटकनाशकांच्या फवारणीने मृत्यू होऊ शकत नाही. हवे तर राजू श्रॉफ स्वत: फवारणी मिश्रणाने आंघोळ करील. 

देशी मद्यविक्रीस आळा घाला! 
बंदीची मुदत संपल्यानंतर केंद्राला बंदीचे पुरावे द्यावे लागतात, तेही दिलेले नाहीत. बंदी उठवण्याचेही आदेश नाहीत. भविष्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढणार असल्यामुळे कीटकनाशक बंदीचा फेरविचार करून, देशी मद्यविक्रीला आळा घालण्याची मागणी क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीसीएफआय) राजू श्रॉफ यांनी केली आहे.

Web Title: mumbai news Insecticide yavatmal farmer