एकबोटेंच्या जामिनावर सुनावणी घेण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल झालेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्या. भूषण गवई यांनी बुधवारी नकार दिला. त्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे अर्जावर सुनावणी होईल.

एकबोटे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज न्या. बी. आर. गवई आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे अर्जाची सुनावणी होती. मात्र खंडपीठाने सुनावणीस नकार दिला, त्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे अर्जावर सुनावणी होईल. काही दिवसांपूर्वी कोरेगाव भीमामध्ये शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक व हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये एका युवकाचा मृत्यूही झाला होता. यानंतर महाराष्ट्र बंदही पुकारण्यात आला होता. या हिंसाचाराच्या घटना कोरेगावमधील दंगलीमधून सुरू झाल्या आणि दंगल चिथावण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद एका महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात हिंदू एकता आघाडीचे एकबोटे आणि शिवराज प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात नोंदविली आहे. पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दंगलीमध्ये माझा सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे.

Web Title: mumbai news maharashtra news Milind Ekbote bell court koregaon bhima