मंत्रिपदासाठी राणेंच्या पुन्हा हालचाली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा महाराष्ट्राला फायदा होईल, त्यांना मंत्री करा अशा हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयावर राणे यांची मदत होईल, तसेच शिवसेनेने नव्याने सुरू केलेली भाषा लक्षात घेता त्यांचा उपयोग होईल, असे दिल्लीतही सांगितले जात आहे. नारायण राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असे प्रयत्न केले जात आहेत.

नारायण राणे आणि आशिष शेलार या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास सरकारची स्थिती सुधारेल, असे भाजपतील एका गटाला वाटते. राणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होऊ शकला नाही.

Web Title: mumbai news maharashtra news narayan rane politics minister