उपनगरीय रेल्वेच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी झालेल्या भेटीत दिली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गोयल यांचे आभार मानले आहेत.

"सह्याद्री' या राज्य अतिथिगृहावर गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे मराठवाड्यातील आर्थिक औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: mumbai news maharashtra news railway bogie generation latur