आमची चौकशी; पण तुम्हाला क्‍लीन चिट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक संपत आलेली असताना शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दिशेने जातात आणि आपली भावना बोलून दाखवत तीव्र नाराजी व्यक्‍त करतात...

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक संपत आलेली असताना शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दिशेने जातात आणि आपली भावना बोलून दाखवत तीव्र नाराजी व्यक्‍त करतात...

मंत्रिमंडळाची बैठक संपताना देसाई हे रावल यांना म्हणाले, "हे बरंय, आम्ही काहीही केले नाही तरीही आमच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे; मात्र मंत्रालयात धर्मा पाटील हे शेतकरी विष पिऊन मरण पावले तरीही आपणास क्‍लीन चिट दिली जाते.' देसाई यांच्या वक्‍तव्याने रावल यांनाही आर्श्‍चयाचा धक्‍का बसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक देसाई यांनी रावल यांना उद्देशून वक्‍तव्य केले असले तरी देसाई यांचा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. कारण नाशिक जिल्ह्यातील "एमआयडीसी'च्या जमिनीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. याची चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. अलीकडेच मंत्रालयात विष पिऊन मरण पावलेले धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील असून, त्यांना मोबदला मिळाला नाही. याकामी मंत्री रावल यांनी पाठपुरावा केला नाही, असा आरोप आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्याने रावल अडचणीत आले असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news maharashtra news subhash desai politics