मराठी चित्रपट न्यूडला 'ए' प्रमाणपत्र

पीटीआय
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आलेल्या "न्यूड' या मराठी चित्रपटाला केंद्रीय सेन्सॉर मंडळाने "ए' प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटातील एकही सीन कापण्यात आलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून केंद्रीय सेन्सॉर मंडळाला धन्यवाद दिले आहे. विद्या बालन या त्याच्या अध्यक्षा होत्या.

आमच्या "न्यूड' चित्रपटाला विद्या बालन यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय सेन्सॉर मंडळाच्या विशेष पथकाने मंजुरी दिली असून, त्या सर्वांना धन्यवाद देत असल्याचे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. या चित्रपटात मुंबईत नग्न मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय पॅनारोमा विभागातून त्याला वगळण्यात आले होते.

Web Title: mumbai news marathi movie nude permission by sensor board