माथाडी, सुरक्षारक्षकांचा उद्या राज्यव्यापी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी मुंबई - महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याचे सरकारचे धोरण माथाडी कायदा आणि माथाडी कामगार चळवळ मोडीत काढणारे असल्यामुळे रद्द करावे, अन्यथा मंगळवारी (ता. ३०) लाक्षणिक संपावर जाण्याचा इशारा माथाडी कामगार संघटना आणि सुरक्षारक्षक संघटनांनी दिला आहे. 

सरकारचे हे दोन्ही निर्णय माथाडी कायदा आणि माथाडी कामगार चळवळ मोडीत काढणारे आहेत. त्यामुळे त्याला तीव्र विरोध करण्यासाठी, सरकारचा हा निर्णय रद्द होण्यासाठी आणि पुढील आंदोलानाची दिशा ठरवण्यासाठी कांदा-बटाटा बाजाराच्या आवारातील प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव उपस्थित होते. या बैठकीत मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संघटनांची कृती समितीही स्थापन केली आहे.

Web Title: mumbai news mathadi kamgar maharashtra band